महेश राऊत मृत्यू प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर नितीन राऊत यांनी उत्तर न देता काढला पळ
हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी महेश राऊत नावाच्या व्यक्तीचा पोलीस कंट्रोल रूम मध्ये 100 क्रमांकावर सतत फेक कॉल करत असल्याचा आरोप करत पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.या घटनेने नागपूर शहर हादरून निघालं होत या प्रकरणात काल पालकमंत्री नितीन राऊत यांनी पोलिसांची पाठराखण करत महेश राऊत यांनी दारू पिऊन सतत कँटोल रूम ला कॉल केला होता यापूर्वी देखील महेश राऊत ने शेजारच्या महिलेचे भांडण सुरू असल्याचे कारण सांगत मनपा आणि पोलिस कर्मीची दिशाभूल केली होती त्यामुळे कदाचित गिलटी वाटल्याने महेश राऊत यांनी आत्महत्या केली असावी असे मत व्यक्त केले मात्र पालकमंत्र्यांनी महेश राऊत यांच्या कुटुंबियांशी किंवा परिसरातील नागरिकांशी भेट न घेता फक्त पोलिसांच्या माहिती वरून केलेल्या वक्तव्यामुळे महेश राऊत यांचं कुटुंबीय अत्यंत दुखावलं आहे... आज असोसिशन ऑफ मेडिकल फ्याकलटिस चा पद्ग्रहण सोहळा शहराच्या तारांकित हॉटल मध्ये आयोजित करण्यात आलं होता या आयोजनात मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते ...दरम्यान शहरातील कोविड नियंत्रणाबाबत त्यांनी । डॉक्टर । मनपा आणि पोलीस विभागाचे मनभरून कौतुक केले ...मात्र महेश राऊत मृत्यू प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता पालकमंत्र्यांनी पळ काढला ... 2 दिवसांपूर्वी भाजप च्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्यक्ष मृतक महेश राऊत यांच्या कुटुंबियांशी भेट घेतली मात्र दोषी पोलिकर्मींना कायम बडतर्फ करण्याची मागणी केली... मात्र पालकमंत्र्यांनी मृतकाच्या कुटुंबियांची कुठलीही भेट न घेता पोलिसांच्या केलेल्या पाठराखणी मुळे मृतक महेश राऊत यांचे कुटुंबीय अत्यन्त दुखावले आहे.
#nitinraut #ncp #politics #nitinrautlive